आज दिनांक 24 1 2024 रोजी गंगामाई शिक्षण शास्त्र महाविद्यालया च्या प्रशस्तक्रीडांगणात नेट बाॕल आंतर महाविद्यालयीन स्पर्धांचे उद्घाटन संस्थेचे सन्माननीय सचिव माननीय श्री बाळासाहेब मनोहर जी भदाणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहाने करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी धुळे क्रीडा असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष ,सर्व सदस्य व विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपप्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व खेळाडू उपस्थित होते
गंगामाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय नगाव येथे 12 जानेवारी 2024 राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन एम पटेल यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. एल. एन. गिरासे व सर्व प्राध्यापक ,विद्यार्थी उपस्थित होते.
गंगामाई शिक्षणशास्त्र महाविद्यालयात दि.6 डिसेंबर 2023 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले
28 नोव्हेंबर 2023 महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमापूजन व विनम्र अभिवादन करताना गंगामाई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एम. पटेल व श्री. एल. एन. गिरासे आणि उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी